आरोपींना नेणाऱ्या पोलीस व्हॅननंच घेतला पेट

कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील आरोपीना भिवंडी न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना भिवंडी कोर्टाच्यासमोर अचानक पोलिस व्हॅनलाच आग लागण्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे .
कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील आरोपीना भिवंडी कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस व्हॅन क्रमांक एम.एच.०४ ए एन १४८० या गाडीने आणण्यात येत होते. वळण घेत असताना समोरील इंजिनला अचानक आग लागली. भिवंडी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. दरम्यान गाडीतील चालक व आत असलेल्या आरोपींनी भिवंडी कोर्टाच्या आवारात धाव घेत आपला जीव वाचविला. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, अशाप्रकारे आरोपीना ने-आण करणाऱ्या पोलिस व्हॅनला आग लागल्याने पोलीस प्रशासनातील वाहनांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती होते कि नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *