संजय दत्तच्या मुलाचे चित्रपटात पर्दापण

संजय दत्तच्या मुलाचे चित्रपटात पर्दापण

बॉलिवूड अभिनेते संजय दत्तने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये चांगले स्थान निर्माण केले आहे. आता त्याच्या पाठोपाठ त्याचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. संजय दत्तच्या होम प्रोडक्शन ‘हसमुख पिघल गया’ या चित्रपटातून शहरान दत्त चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत आहे.

राजकपूर यांच्या ‘किसी की मुस्कुराहटों पे..’ या गाण्यामध्ये शहरान एक छोटी भूमिका करतांना पहायला मिळणार आहे. गाण्याच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत या गाण्यात शहरान असणार आहे.

‘हसमुख पिघल गया’ हा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत अजुन कोणतिही माहिती मिळालेली नाही. पण हा एक रोमॅंटीक विनोदी चित्रपट असल्याचे बोले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *