विमान प्रवासावेळी चौकशी दरम्यान पगडी उतरविण्यास नकार देणाऱ्या शीख अभिनेत्याला विमान प्रवासास मज्जाव केल्याची घटना समोर आली आहे.
अमेरिकेत एरोमेक्सिको येथून न्यूयॉर्कला येत असताना शीख अभिनेते वारिस अहलुवालिया यांच्याबाबत ही घटना घडली. विमानात प्रवेश करण्यापूर्वी चौकशी करताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना पगडी उतरविण्यास सांगितले. मात्र, अहलूवालिया यांनी पगडी उतरविण्यास नकार दिल्याने त्यांना प्रवासापासून रोखण्यात आले.
अहलूवालिया यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती देताना सांगितले, की मला आज सकाळी सांगण्यात आले की पगडी न उतरविल्याने न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानातून तुम्ही प्रवास करू शकत नाही. मला बाजूला थांबवून इतर प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.
