सुरक्षा अभियान ट्रस्ट आयोजित चित्र प्रदर्शन आणि कार्यशाळा संपन्न…
दिनांक 3 फेब्रुवारी व 4 फेब्रुवारी 2016 रोजी टाऊन हॉल ठाणे येथे रस्ता सुरक्षा विषयक चित्रप्रदर्शन सकाळी 11 ते संध्या. 7 वा.पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे विनोद पांडकर प्रादेशिक परिवहन अधिकारी, डॉ. एम.पी. पाटील सिव्हील सर्जन, संजय ससाणे उप.प्रादे. परिवहन अधिकारी ,दिनेश महाजन कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग व रस्ता सुरक्षा संबधित विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.
चित्रप्रदर्शनाचे उदघाटन विनोद पांडकर यांच्या हस्ते व नंतर दीप प्रज्वलन डॉ. एम.पी. पाटील व उपस्थीत मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्तावीक सुरक्षा अभियानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.विलास ज. पवार यांनी केले व त्यांनी रस्ता सुरक्षा अभियान कामकाजा बद्दल सविस्तर माहिती दिली. रस्ता सुरक्षे विषयक माहिती देणा-या दोन पुस्तिकांचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. प्रमुख पाहुणे व उपस्थीत मान्यवर यांची भाषणे झाली. विनोद पांडकर आणि डॉ. एम.पी. पाटील यांनी सुरक्षा अभियान ट्रस्ट ला सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या उदघाटन कार्यक्रमात अभियंते, मोटार वाहन अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्खेने उपस्थीत होते.
या दरम्यान कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात मोटार वाहन विभाग ठाणे , आरोग्य विभाग ठाणे, स्काउट गाईड प्रशिक्षक ,शिक्षक, नर्सिंग स्टाफ सहभागी होते.
या दोन दिवसाच्या रस्ता सुरक्षा चित्र प्रदर्शनात 1100-1200 विद्यार्थानी भेट दिली आणि या दरम्यान सुरक्षा अभियानच्या “सेफ्टी मॅन” या पुस्तकाचे विनामुल्य वाटप विद्यार्थ्याना करण्यात आले . रस्ता सुरक्षा विषयी विविध चित्रफीती कार्यशाळेत दाखविण्यात आल्या . रस्ता सुरक्षा अभियानच्या विश्वस्त विशाखा पवार यांनी कार्यशाळेत उपस्थितांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दोन दिवसाच्या कार्यशाळेत अनेक नामवंतानी सहभाग घेतला होता. वैभव काळे, विनायक जोशी, शरीका कौर, राजश्री टोपे, एस.जी.आगाशे या नामवतांनी रस्ता सुरक्षा विषयावर कार्यशाळेत भाग घेतलेल्यांना फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यशाळे दरम्यान पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर रस्ता सुरक्षेचे पथनाट्य कसे करावे या बद्दल मार्गदर्शन विनोद शिंदे यांनी केले. उपस्थित सर्वानी कार्यशाळेचे आयोजन केल्या बद्दल सुरक्षा अभियानचे आभार मानले व चळवळीत सामावून घेण्याची विनंती अनेकांनी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.विलास पवार यांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे फलित सांगून ” आपण वर्षभर रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम राबविणार आहोत आणि त्या विषयी जनजागृती करण्यासाठी सातत्याने असे कार्यक्रम करत राहणार आहोत” व आपण सुद्दा यात सहभागी व्हावे असेउपस्थितांना अावाहन केले व कार्यशाळेची सांगता झाली असे जाहीर केले.