महिला जिल्हाधिका-यांसोबत ‘सेल्फी’ काढणा-याला न्यायालयीन कोठडी

महिला जिल्हाधिका-यांसोबत ‘सेल्फी’ काढणा-याला न्यायालयीन कोठडी

बुलंद (उत्तर प्रदेश) येथे जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न करणा-याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बुंदल शहराच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांची कार्यालयामध्ये सुनावणी सुरू होती. या वेळी त्या बोलत असताना फरद अहमद (१८) हा त्यांच्या जवळ येऊन त्यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढू लागला. या वेळी त्यांनी अनेक छायाचित्रे काढली. ही बाब चंद्रकला यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

या तरुणाने मी अधिकारी नसून महिला असल्याची जाण ठेवायला हवी होती आणि प्रत्येकानेच या गोष्टीची जाण ठेवावी. सेल्फी काढला म्हणून या तरुणाला अटक झाली नसून त्याने मोबाईलमधील छायाचित्र डिलिट करायला सांगितल्यानंतर जो गोंधळ घातला त्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे चंद्रकला म्हणाल्या.

दरम्यान फरद याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *