पुण्यात ट्रकची तीन गाड्यांना धडक, तीन ठार

ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यामुळे समोरुन येणा-या ट्रॅक्टर, दुचाकी आणि स्विफ्ट या तीन गाड्यांना ट्रकची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला.  या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील लवळे गावाजवळ रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

ओमकार संतोष जाधव (७), दुचाकीवरुन जाणारे अभिजीत सुरेश दगडे (१९) आणि समीर संजय उभे (१८)  यांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील पौड येथील लवळे गावाजवळ पुण्यावरुन येणा-या ट्रकचे ब्रेक निकामी झाले होते. त्यामुळे या ट्रकची समोरून येणा-या ट्रॅक्टर, दुचाकी आणि स्विफ्ट गाडीला त्याने उडविले. आणि हा भीषण अपघात झाला. पौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *