आम आदमी पार्टीचा आमदार महिंद्र यादव याला सरकारी कर्मचा-याला मारहाण प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महादंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश हरविंदर सिंग यांनी यादवला पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. यादव हा विकासपुरी भागातील आमदार आहे. आमदार महिंद्र यादव याच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात इतर दोघे जणही सहभागी होते.
त्यांची ओळखही पटवण्यात आली आहे. न्यायालयाने सरकारी कर्मचारी मारहाण प्रकरणात रुपेश कत्यानी, देवेंद्र कुमार, रोशन कुमार आणि शैलेश कुमार यांनाही अटक करण्यात आली होती.
त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला.