अभिनेता सलमान खान लवकरच मामा होणार आहे. सल्लूची लाडकी बहिण अर्पिताचे काही दिवसांपूर्वी बेबी शॉवर झाले.
गतवर्षी विवाहबंधनात अडकलेली सलमानची लहान बहिण अर्पिता खान शर्मा लवकरच आई होणार आहे. मातृत्वाची चाहूल लागलेल्या अर्पिताची नुकतीच ओट भरणी (बेबी शॉवर) करण्यात आली.
यावेळी अर्पिताची आई, बहिण तसेच तिच्या मैत्रिणीही उपस्थित होत्या. यावेळी अर्पिताने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे टाइट्स-टीशर्ट परिधान केले होते.