शहीद महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

शहीद महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने सोमवारी पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. यावेळी शहीद संतोष महाडिक यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र बहाल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना गोळीबारात जखमी झालेल्या महाडिक यांची प्राणज्योत मालवली. यापूर्वी त्यांचा ‘सेना मेडल’ देऊन गौरव करण्यात आला होता.

महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण (सायन्स) महाविद्यालयात झाले होते. १९९८मध्ये ते लष्कराच्या विशेष दलात सहभागी झाले होते. त्यांना अतुलनीय शौर्याबद्दल पदक देऊन गौरवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *