माथेफिरू तरणानं लावली लोकलच्या महिला डब्याला आग

शनिवारी रात्री वेस्टर्न लाईनवर उभ्या असलेल्या एका लोकलच्या महिला डब्याला आग लावण्यात आली. एका 25 वर्षांच्या तरुणानं ही आग लावली. चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्टेशनदरम्यान ही ट्रेन उभी होती. या आगीमध्ये ट्रेनचा संपूर्ण डबा जळाला. आग लावणा-या तरुणला पोलिसांनी अटक केलीय. महत्त्वाचं म्हणजे या तरुणाने जेलमध्ये जाण्यासाठीच हे कृत्य केल्याचं म्हंटलय. नोकरी नसल्याने घरचे त्याच्याकडे सारखा तगादा लावून होते. त्यामुळे त्याने ट्रेनच्या डब्याला आग लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *