शनिवारी मध्यरात्री एक च्या सुमारास बंदुकीतुन स्वतःवर गोळी झाडून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नवी सांगवी येथे घडली. या तरुणाचे नाव देवेंद्र गितेश्वर गोरे असे असून तो २४ वर्षाचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार सांगवी येथे देवेंद्र एका तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत होता. देवेंद्र याने एका राठी नावाच्या व्यक्तीकडून १५ लाख रुपये व्याजाने उचलले होते. काही कारणांमुळे देवेंद्र ते पैसे व्याजासह परत करू शकला नाही. यामुळे राठी याने देवेंद्रच्या मागे पैशांसाठी तगादा लावला होता. त्याला वैतागून देवेंद्रने राठीला संपविण्याचा प्लॅन केला. त्या व्यक्तीची हत्या करण्यासाठी त्याने पिस्तुल विकत घेतले होते.
शनिवारी रात्री देवेंद्रने मद्यपान केले होते. राठी अनेक दिवस शोधुनही सापडत नसल्याच्या तो तणावाखाली होता. याच तणावाखाली त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली अशी माहिती त्याच्यासोबत राहणा-या तरुणीने पोलिसांना दिली .