थंडीचा कडाका कायम राहणार

थंडीचा कडाका कायम राहणार

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून, पुढील चोविस तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे गुरुवारी वर्तविण्यात आली. पुण्यात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक येथे 7.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली आहे. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून, येत्या रविवारनंतर (ता. 24) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, अमरावती, मराठवाड्यातील नांदेड, परभणी येथे थंडीची लाट आली होती. किमान तापमान दहा अंशापेक्षा कमी झाले होते आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली होती.

पुण्यात कमाल तापमान 3.2 अंश सेल्सिअसची घट झाली. यंदाच्या हंगामात डिसेंबरमध्ये 6.6 अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिवसाच्या तापमानातही 4.3 ने घट होऊन 25.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *