पठाणकोट येथे जवानांच्या गोळीबारात संशयित ठार

पठाणकोट येथे जवानांच्या गोळीबारात संशयित ठार

पठाणकोटजवळ भारत-पाक सीमेवरून घुसखोरी करणा-या संशयिताला सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळी घालून ठार केले. गुरूवारी पहाटेच्या वेळेस ही घटना घडली.

भारतीय सीमेजवळ बामियाल परिसरात तीन संशयित दहशतवादी घुसखोरी करत होते. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दिशेने गोळीबार केला. त्यात एकाला ठार मारण्यात आले. मात्र, दोन जण तेथून पसार झाल्याची माहिती लष्करी अधिका-यांनी दिली.

पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर दोन जानेवारीला दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे या परिसरात सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *