पाकिस्तानात विद्यापीठावर दहशतवादी हल्ला, २५ ठार

पेशावर- पाकिस्तानमध्ये बाचा खान विद्यापीठावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. सुमारे ६० विद्यार्थी जखमी आहे. ही घटना बुधवारी घडली.

पाकिस्तानमधील चारसदा येथे असलेल्या बाचा खान विद्यापीठात अचानक आठ ते दहा दहशतवादी घुसले. त्यांनी विद्यापीठाच्या बाहेर स्फोट घडवून आणला. विद्यापीठात विद्यार्थ्यांवर अंदाधुद गोळीबार करण्यास सुरूवात केली. या विद्यापीठात हल्ल्यावेळी सुमारे तीन हजार विद्यार्थी होते.

यावेळी दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्याचे वृत्त आहे.

पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले असून अजूनही त्यांच्यात चकमक सुरू आहे. या हल्ल्यामध्ये सुमारे ६० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

काही विद्यार्थ्यांना विद्यापीठातून सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. बाचा विद्यापीठ पेशावरपासून थोड्या फार अंतरावरच असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *