ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन

  • ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
     सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव माहित आहे पण याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले  अरुण टिकेकर यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *