भारी! फक्त ओरडा सेल्फी आपोआप क्लीक होणार

भारी! फक्त ओरडा सेल्फी आपोआप क्लीक होणार

सेल्फी काढणाऱ्या शौकिनांसाठी आता एक नवं अॅप आलं आहे. हे अॅप जरा आगळंवेगळं आहे. या अॅपमुळे  फक्त ओरडून आपण सेल्फी काढू शकता.

अॅप्पल स्मार्टफोनसाठी हे अॅप तयार करण्यात आलं आहे. ‘ट्रिगरट्रेप सेल्फी’ हा आवाजाच्या आधारे फोन कॅमेरा ऑन होतो. या अॅपला कॅमेऱ्यातील ट्रिगर बनविणारी कंपनी ट्रिगरट्रॅपने तयार केलं आहे.

या अॅपच्या मदतीने सेल्फी काढणं फारच सोपं होणार आहे. आपणं फक्त फोनमध्ये आपली फ्रेम सेट करायची आणि ओरडायचं. की झालं आला आपला सेल्फी. तुमचं ओरडणं ऐकून फोन कॅमेरा सुरु होईल आणि सेल्फी क्लीक होईल. सेल्फी क्लीक झाल्यानंतर हे अॅप तुम्हांला सेल्फीचं प्रिव्ह्यू देखील दाखवेल.

ट्रिगरट्रॅपच्या मते, “ओरडण्यामुळे स्मार्टफोनचे पिक्सलेटेड स्क्रिन साफ होतं आणि कॅमेरा तुमचा सेल्फी क्लिक होतो.

या अॅपमध्ये स्मार्ट फेस डिटेक्शन या प्रणालीचाही समावेश आहे. कारण की ओरडल्यानंतर कॅमेरा सेल्फी तेव्हाच काढू शकेल जेव्हा त्याला चेहरा दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *