‘लगान’ या चित्रपटातील ‘गुरन’ची भूमिका साकारणारा अभिनेता राजेश विवेक यांचे हैद्राबादमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
हैद्राबादमध्ये ते एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना ह्दयविकाराच्या तीव्र झटका आला.
राजेश विवेक यांनी १९८८ मध्ये छोट्या पडद्यावरील भारत एक खोज मधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर जुनून या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले पाऊल टाकले.
‘लगान’ चित्रपटात त्यांनी साकारलेली‘गुरन’ची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांची स्वदेश या चित्रपटातील पोस्टमनची भूमिका साकारली होती.
‘भारत एक खोज’, ‘महाभारत’ आणि ‘अघोरी’ या गाजलेल्या दूरचित्रवाहीनी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यानंतर ’विराना’, ‘जोशिले’ चित्रपटात त्यांनी काम केले होते. प्रेक्षकांना ते विनोदी भूमिकेतूनही पहायला मिळाले.