पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील. अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश नव्या दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रय स्थाने ठरु शकतात असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बुधवारी म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात त्यांनी दहशतवादापासून अमेरिकेला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले. आज अमेरिकेला इसिस आणि अलकायदा या दोन अतिरेकी संघटनांपासून थेट धोका आहे. आजच्या जगात दहशतवाद्यांसाठी मानवी जीवनाचे अजिबात मूल्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
आपले परराष्ट्र धोरण इसिस आणि अलकायदा यांना रोखण्याच्या दिशेने असले पाहिजे. इसिस संघटना नसती तरी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मिडल इस्ट आणि अन्य काही देशांमध्ये अस्थिरता कायम राहिली असती. पाकिस्तान, अफगाणिस्तान हे भाग अतिरेक्यांसाठी सुरक्षित तळ ठरु शकतात या धोक्याकडेही ओबामांनी लक्ष वेधले.