हरियाणा नव्याने नियुक्त झालेल्या सरपंचाची हत्या

हरियाणामधील खेदी तलौरा गावात नव्याने नियुक्त झालेल्या सरपंचाची हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली होती. गावच्या सरपंचपदी रमेश यादव (वय 40) यांची नियुक्ती झाली होती. निवडणुकीसाठी त्यांनी आपली दोन हेक्‍टर जमीन विकली होती. चुरशीच्या झालेल्या लढतीत विरोधक अल्प मतांनी पराभूत झाले होते. या रागातूनच त्यांच्यावर हल्ला झाला असल्याची शक्‍यता आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे. यादव यांच्या कुटुंबीयांनी गावातील काही जणांवर संशय व्यक्त केला आहे.

गावामध्ये रविवारी (10) मतदान झाले होते. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी यादव यांची सरपंचपदी नियुक्ती झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *