अफजल गुरुच्या मुलाला दहावीत 95% गुण

संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेला अफजल गुरु याच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत तब्बल 95 टक्के गुण मिळविले आहेत.
 
जम्मू काश्मीर शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरू याने हे यश मिळविले आहे. गालिबला 500 गुणांपैकी 474 गुण मिळाले आहेत. या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. त्याला सर्व पाच विषयांमध्ये ‘ए1‘ ग्रेड मिळाली आहे. गालिबच्या यशानंतर सोशल मिडीयावर हा चर्चेचा विषय ठरला होता. फुटीरतावाद्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे राहत असलेला गालिब हा येथून पहिला आला आहे.
 
संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याला 9 फेब्रुवारी 2013 मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *