खळबळजनक वक्तव्यांनी चर्चेत राहणारे भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी आणखी एक वादग्रस्त प्रस्ताव मांडलाय. आयोध्येत राम मंदीर बांधण्यासाठी मुस्लिमांना आम्ही भगवान श्रीकृष्णाचे पॅकेज देत आहोत, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “तुम्ही आम्हाला फक्त तीन मंदिरे द्या आणि त्या बदल्यात ३९ हजार ९९७ मशिदी तुम्हाला ठेवा. मला आशा आहे की मुस्लिम नेता दुर्योधन नाही बनणार,” असे रविवारी ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली विद्यापीठात शनिवारी राम मंदिराबाबत आयोजित एका शिबिरातही स्वामींनी मंदिराबाबत ठाम असल्याचे सांगितले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही राम मंदिराला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावाही स्वामींनी केला होता.