पुणे:गणेशखिंड रस्त्यावर अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे विद्यापीठजवळील रेंजहिल्स रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी आठ वाजता खासगी बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी खासगी बसने मागून धडक दिल्याने माया राजपाल यादव (वय 50) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक (MH 43-H 477) फरार झाला असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *