तगडी स्टारकास्ट आणि जबरदस्त अभिनयाने सजलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने आठवड्याभरात तब्बल १६ कोटी ५० लाखांचा गल्ला जमवलाय.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीला हा सिनेमा रिलीज झाला होता. वि. वा. शिरवाडकर यांच्या गाजलेल्या नटसम्राट या कलाकृतीवर आधारित नटसम्राट हा सिनेमा बनवण्यात आला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी नटसम्राट अर्थात आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारलीये. तीन दिवसांत या चित्रपटाने तब्बल १० कोटींची कमाई केली होती.