आसाराम बापूचा जामीन अर्ज सहाव्यांदा फेटाळला

आसाराम बापूचा जामीन अर्ज सहाव्यांदा फेटाळला

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याचा जामीन अर्ज येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.

बलात्कार प्रकरणी सध्या तो तुरुंगाची हवा खात आहे. ७४ वर्षीय आसारामने आत्तापर्यंत जवळपास सहावेळा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे.

१६ वर्षीय शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे केल्याच्या आरोपाखाली ऑगस्ट २०१३ साली त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्जावर सुनावणी दिली. त्यावेळी पीडीत मुलीचे वकील पी. सी. सोलंकी यांनी सांगितले की, ‘न्यायालयाने आसाराम याच्या वयाबाबत कोणताचा युक्तीवाद ग्राह्य धरला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *