बिहार येथील बेतीह रेल्वे स्थानकाजवळ दोन तरुण महिलांना धावत्या ट्रेनमधून दोन व्यक्तींनी ढकलल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी जबर जखमी झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
बेतीह रेल्वे स्थानक हे पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात मोडते. या दोन महिला उत्तरप्रदेशातील राहणा-या असून ममता मिश्रा व श्वेता वर्मा अशी त्यांची नावे आहेत.
या दोन महिला नर्कतीयागंज- हाजीपूरजवळ एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. या घटनेत श्वेता वर्मा हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर ममता सरकारी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
या घटनेचा तपास सुरू आहे. या दोन्ही महिलांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.