अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची नोंद ५.० रिश्टर इतकी करण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
अफगाणिस्तानमधील हिंदूकुश पर्वतात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
अफगाणिस्तानबरोबरच या भूकंपाचे धक्के भारतातील काश्मीरसह पाकिस्तान, पेशावर, हरिपूर, दिर, एबोटाबाद शहरांनाही जाणवले. भूकंपाच्या धक्कामुळे नागरिकांनी भयभीत होऊन बचावासाठी घराबाहेर पळ काढला.
२०१६ च्या नव वर्षाच्या सुरूवातीपासूनच अफगाणिस्तानला भूकंपाचे धक्के जाणवत असून ही तिसरी घटना आहे. याच भागात मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये ७.५ रीश्टरचा तीव्र भूकंप झाला होता. यामध्ये वायव्य पाकिस्तान भागात राहणा-या लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भूकंपात ३०० लोक ठार झाले होते.