शिक्षकांनी शाळेच्या आवारात व्यसन करू नये- शिक्षणमंत्री विनोद तावडे

शिक्षकांनी शाळेच्या आवारात व्यसन करू नये- शिक्षणमंत्री विनोद तावडे

शाळेच्या आवारात तंबाखु, दारूचं व्यसन करणाऱ्या शिक्षकांवर आता कारवाई करणार असल्याचा इशारा, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे.

व्यसनी शिक्षकांना प्रमोशन, शिक्षक पुरस्कार तसेच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा बंद करण्यात येतील, असं तावडेंनी म्हटलं आहे. जे शिक्षक सांगूनही या नियमाचं पालन करणार नाही, त्यांना बडतर्फ केलं जाईल, असंही तावडेंनी ठणकावून सांगितलं.

शिक्षकांनी शाळेच्या आवारात व्यसन करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो. ते सुद्धा हळूहळू व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे शाळेच्या आवारात शिक्षकांनी व्यसन टाळावं, असं तावडेंनी म्हटलं आहे.

एखाद्याला लागलेलं व्यसन सुटत नाही त्याला वेळ द्यायला हवा. मात्र व्यसन बंद करण्यासाठी सरकार अशी पावलं उचलत असल्याचं तावडेंनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *