शनिशिंगणापूर देवस्थानच्या इतिहासात क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळात पहिल्यांदाच महिलांचा समावेश करण्यात आला आहे. सहायक धर्मादाय आयुक्तांनी या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या अकरा सदस्यीय विश्वस्त मंडळात अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोन्ही महिलांना संधी मिळाली आहे.
विश्वस्तपदासाठी तब्बल ९८ अर्ज आले होते. यात ८८ अर्ज पुरुषांचे तर १० अर्ज महिलांनी केले होते. त्यापैकी दोन महिलांना ११ सदस्यांच्या विश्वस्त मंडळात नेमणूक करण्यात आली आहे.
शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर एका महिलेने प्रवेश केला आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. यानंतर ४ ते ५ महिलांनी विश्वस्तपदासाठी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. अखेर बुधवारी अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोन महिलांना संधी मिळाली आहे.