देवाच्या दारात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या

देवाच्या दारात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या

भर चौकात डोळ्यात मिरचीची पूड फेकून एका तरुणाची त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच हत्या करण्यात आलीय. पंढरपूरमध्ये हा प्रकार घडलाय. सोमनाथ टाकणे असं या तरुणाचं नाव आहे. टाकने हा पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचा जावई आहे.

साधना भोसले यांच्या मुलीने सव्वा वर्षापूर्वी टाकणे सोबत विवाह केला होता. त्याचा भोसले कुटुंबातील नातेवाईकांच्या मनात राग होता. सोमनाथ टाकणेचा हा दुसरा विवाह होता. त्याला टाकणेला आधीच्या पत्नीपासून दोन मुलंही आहेत.

बुधवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास टाकणे हा पत्नी आणि आपल्या मुलाला घेऊन जात होता. यावेळी, अचानक दुचाकीवरून आलेल्या १०-१२ जणांच्या टोळक्यानं त्यांना गाठलं. सोमनाथच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून धारदार शस्त्रांनी त्यांच्यावार केले गेले. यात सोमनाथ जागीच ठार झालाय. पंढरपूर नगरपालिकेजवळच्या भादुले चौकात हा थराराक प्रकार घडला. त्यामुळे नागरिकही धास्तावले आहेत.

हल्ला करणाऱ्यांपैकी अनेकांना सोमनाथच्या पत्नीनं ओळखलं आहे. यासंबंधी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *