ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांकडून आता दंड रोख रक्कमेत घेतला जाणार नाही. यासाठी क्रेडीट किंवा डेबिट कार्डचा वापर केला जाणार आहे. 12 जानेवारीपासून ही विशेष व्यवस्था मुंबईत लागू होणार आहे. यासाठी ई-चलानच्या 1000 मशीन ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
जर ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाकडे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड नसल्यास त्यांना 15 दिवसांचा वेळ देण्यात येईल. या 15 दिवसात वाहनचालकाला एनईएफटीद्वारे थेट नेट बँकिंगने ट्रॅफिक पोलिसांच्या बँक अकाउंटमध्ये टाकावे लागणार आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या नव्या व्यवस्थेमुळे फक्त भष्ट्राचारालाच आळा नाही बसणार नाही तर वारंवार नियम तोडणाऱ्यांचाही ओळख पटविता येणार आहे. दरम्यान, तेलंगणा आणि तामिळनाडू मध्ये ही व्यवस्था आधीच लागू करण्यात आली आहे. त्यामुळेच आता मुंबई पोलिसांनीही याची जोरदार तयारी केली आहे.