कल्याणच्या प्रणवचा नाबाद ९०० धावा

कल्याणच्या प्रणवचा नाबाद ९०० धावा

कल्याणच्या १६ वर्षाच्या प्रणव धनावडेने जबराट खेळी केली असून ९०० धावांची विक्रमी खेळी कल्याणकरांना मंगळवारी पहायला मिळाली. त्यामुळे आता कल्याणच्या के. सी. गांधी शाळेच्या ११५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रणवने ही खेळी केली आहे. वायले नगर परिसरात युनियन क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर हा सामना चालू आहे. सोमवारी त्याने १९९ चेंडुत नाबाद ६५२ धावांची खेळी केली.

कल्याणच्या के.सी.गांधी शाळेत १० वी इयत्तेत शिकणा-या प्रणवने रेकॉर्ड ब्रेक खेळी केली आहे. के. सी. गांधी शाळेने पहिल्या दिवसअखेर एक बाद ९५६ धावांची मजल मारली होती.

प्रणवसोबत सलामीला उतरलेल्या आकाश सिंगने १७३ धावांची, तर सिद्धेश पाटीलने नाबाद १०० धावांची खेळी केली. प्रणव अजूनही धावपट्टीवर भक्कम पाय रोवून धावांचा पाऊस पाडतोय. मात्र सिद्धेश पाटील १३८ धावा करून माघारी परतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *