नव्या वर्षात मोदींचे विदेश दौरे होणार कमी!

नव्या वर्षात मोदींचे विदेश दौरे होणार कमी!

नव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी कमीत कमी विदेश दौरे करणार असून ते केवळ काही निवडक देशांचेच दौरे करणार आहेत. तसेच केवळ काही विशेष आंतरराष्ट्रीय संमेलनालाच उपस्थित राहणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

मोदींच्या विदेश दौऱ्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याचे म्हणत ते अनिवासी भारतीय पंतप्रधान असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येते. गेल्या 19 महिन्यात मोदींनी तब्बल 33 देशांना भेटी दिल्या. 2015 मध्ये मोदींनी 26 देशांना भेटी दिल्या. या सर्व दौऱ्यांसाठी पंतप्रधानांचा दोन महिन्यांचा वेळ खर्ची पडला. दरम्यान मोदी सर्वच आघाड्यांमध्ये अपयशी ठरल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. याबाबत बोलताना माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम म्हणाले, ‘देशातील महागाई, गुन्हेगारी अशा काही बाबींवर नियंत्रण ठेवण्यात मोदी अपयशी ठरले असून नेपाळशी बिघडलेले संबंध हा देखील सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे.‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *