हवाई इंधन स्वस्त झाले असून विनाअनुदानित सिलिंडर आणि केरोसिनच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यात विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत तिस-यांदा ही वाढ झाली.
विनाअनुदानित सिलिंडर ४९ टक्क्याने शुक्रवारपासून महाग झाले आहे. तसेच विनाअनुदानित केरोसिनच्या दरातही १.०५ रुपयांनी वाढ झाली.
१४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत ४९.५ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत या विनाअनुदानित गॅसच्या किंमतीसाठी ६५७.५० रुपये मोजावे लागतील.
तर विनाअनुदानित केरोसिनच्या दरात १.०५ रुपयांनी वाढ झाली असून ते ४३.१९ रुपयांना मिळणार आहे.
तेल कंपन्यांनी सांगितले की, हवाई इंधन १० टक्क्याने स्वस्त झाले आहे. दिल्लीत एक किलोलिटर इंधनच्या दरात ४४२८ रुपयांनी कपात झाली आहे. विनाअनुदानित हवाई इंधनाचा दर ३९८९२.३२ रुपये असेल. प्रत्येक राज्यातील मूल्यवर्धित करानुसार त्याचे दर वेगवेगळे असतील.