औषधी आवळा

औषधी आवळा

आवळ्याचे चटपटीत सरबत
साहित्य : 5-6 आवळे, अर्धा चमचा मीरेपूड, अर्धा चमचा आल्याचा रस, चवीप्रमाणो मीठ, दोन चमचे साखर आणि पाव चमचा लिंबाचा रस
कृती : सर्वप्रथम आवळे वाफवून घ्यावे. बिया बाजूला काढून गर काढून घ्यावा. गरामध्ये साखर,  मीरेपूड, मीठ, आल्याचा रस, लिंबाचा रस घालून पल्प बनवावा. चाळणीने गाळून घ्यावा. दोन चमचे आवळ्याचा रस आणि त्यात पाणी घालून सरबत चांगलं ढवळून घ्यावं.
 आवळ्याचं लोणचं
साहित्य : 10-12 मोठे आवळे, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी मोहरी डाळ, 10 ग्रॅम हिंग, 3 चमचे हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धी वाटी मेथ्या,  एक चमचा बडीशेप आणि तेल.
कृती : आवळे मऊ होईर्पयत उकडून घ्यावेत.  बिया काढून पाकळ्या सुटय़ा करून घ्याव्यात.
मेथ्या तेलात लालसर तळून बारीक कुटाव्यात. बडीशेपही परतून घेऊन कुटावी. हिंग जाडसर असल्यास कुटून घ्यावा. लाल तिखट, मीठ, हळद,  मेथीपूड, बडीशेप तेलामध्ये परतून सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून मोहरीची डाळ टाकावी. मिश्रण गार झाल्यावर सर्व जिन्नस मिश्रणात ओतावे.
शेवटी आवळ्याच्या फोडींना मसाला चोळून फोडी बरणीत भरून ठेवाव्यात. नंतर तेल गरम करून गार करावं आणि लोणच्याच्या बरणीत ओतावं.
 आवळ्याची सुपारी
साहित्य :
1 किलो आवळे,
25 ग्रॅम सैंधव मीठ, 1क् ग्रॅम काळी मिरी.
कृती : आवळे स्टीलच्या किसणीने किसून घ्यावेत. सैंधव मीठ कुटून त्याची पूड करावी.
मिरी बारीक कुटावी. हे दोन्ही एकत्र करून आवळयाच्या किसाला ते लावून ठेवावं.
किस फडक्यात घेऊन ते  स्टीलच्या पातेल्यात रात्रभर ठेवावा. हा कीस सकाळी फडक्यावर पसरून सावलीत वाळवावा. या सुपारीनं तोंडाला चवच येते.
 आवळा सुपारीच्या गोळ्या
साहित्य : 5क्क् ग्रॅम आवळे, 15 ग्रॅम आलं, 2 चमचे जिरेपूड, अर्धा चमचा काळी मिरीपूड आणि चवीप्रमाणो मीठ.
कृती : प्रथम आवळे चांगले उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात. आल्याचं वरचं साल सोलून घ्यावं. आवळ्याच्या पाकळ्या बारीक वाटाव्यात. नंतर सर्व जिन्नस एकत्र करून त्याच्या बोराएवढय़ा गोळ्या करून उन्हात वाळवाव्यात.
 गोड सुपारी
साहित्य : 1 किलो आवळे, चवीप्रमाणो सैंधव मीठ, 10 ग्रॅम काळी मिरीपूड, 10 ग्रॅम ओवापूड, 10 ग्रॅम आल्याचा रस आणि 500 ग्रॅम साखर
कृती : सर्वप्रथम आवळे चांगले उकडून घ्यावेत.  बिया काढून टाकाव्यात. साखरेचा पाक घट्ट करावा आणि त्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, आल्याचा रस, ओवापूड हे सर्व साहित्य एकत्र करावं. चार दिवस भिजत घालावं. नंतर भिजलेल्या आवळ्याच्या पाकळया चाळणीनं चाळून घ्याव्यात. पाकळया ताटामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर उन्हात वाळवाव्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *