अवघ्या ७१६ रुपयांत स्पाईसजेटने करा विमान सफर

अवघ्या ७१६ रुपयांत स्पाईसजेटने करा विमान सफर

स्पाईसजेट विमान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरात हवाई सफर करण्याची ऑफर दिलीय. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कंपनीने ‘हॅप्पी न्यू इयर सेल या नावाने ही योजना सुरु केलीय.

या योजनेंतर्गत तुम्ही केवळ ७१६ रुपयांत विमान प्रवास करु शकता. ही ऑफर केवळ देशांतर्गत प्रवासासाठी लागू करण्यात आलीय. या योजनेंतर्गत तुम्ही २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तिकीट बुक करु शकता. १५ जानेवारी ते १२ एप्रिल २०१६दरम्यान तुम्ही स्वस्त विमान प्रवासाची मजा घेऊ शकता.

स्पाईसजेटची वेबसाईट, अॅपवरुन वा अन्य ठिकाणांहून तुम्ही हि तिकीटे बुक करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *