सलमानचा बर्थडे केक 400 फूट लांबीचा

सलमानचा बर्थडे केक 400 फूट लांबीचा

बॉलीवूडचा दबंग खान याने नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली पण वाढदिवसाचं आकर्षण ठरला तो 400 फुटाचा केक.

सलमानच्या चाहत्यांनी 400 फूट लांबीचा केक तयार केला होता. या केकची गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सलमानच्या नावावर आणखी एका रेकॉर्डची नोंद होणार आहे.

पनवेलमधील फार्म हाऊसवर सलमानच्या बर्थडे पार्टीचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सानिया मिर्झा, तब्बू, फराह, रितेश देशमुख, पत्नी जेनेलियासह अनेक कलाकार उपस्थित होते.

सलमानच्या वाढदिवसाला पार्टीला हजेरी लावणाऱ्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *