शरद जोशींच्या मृत्यूपत्रात शेतकरी, सेवेकरी, ड्रायव्हरसाठी आयुष्याची कमाई दान

शरद जोशींच्या मृत्यूपत्रात शेतकरी, सेवेकरी, ड्रायव्हरसाठी आयुष्याची कमाई दान

दानशूरता कशी असावी हे सांगताना कर्णाचा दाखला दिला जातो आणि तोच वारसा शेतकरी नेते शरद जोशी यांनी मृत्यूपश्चातही चालवला आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या इच्छापत्रात शेतकरी, सहकारी, सेवा करणाऱ्यांचा इतकंच काय तर आपल्या ड्रायव्हरचाही विचार केला आहे. शरद जोशी यांनी आपली संपत्ती त्यांच्या नावे करण्याचा इच्छापत्रात म्हटलं आहे.

खरंतर इच्छापत्रात वारसदारांचा विचार आधी केला जातो. पण शरद जोशी यांनी मृत्यूपत्रात आपल्या संपत्तींचा काही वाटा त्यांच्या ड्रायव्हरलाही देण्याचं नमूद केलं होतं. पवनारच्या नदीकाठी गुरुवारी शरद जोशी यांच्या हितचितंकाची प्राथर्नासभा झाली आणि या सभेत शरद जोशींच्या इच्छापत्राचा खुलासा झाला. जोशींचे विश्वासू सहकारी रवी काशी यांनी त्यांच्या इच्छापत्राबाबत सांगितलं.

पुण्यातल्या आंबेठाण इथे शरद जोशी यांची 21 एकर जमीन आहे, जी अंगारमळा या नावानेही ओळखली जाते. त्यापैकी 14 एकर जमीन जोशींनी काही काळापूर्वी विकली होती. त्यातून आलेली रक्कम त्यांचे सेवेकरी, साथीदार आणि वाहन चालकांना दिली जावी, असं त्यांच्या मृत्यूपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मागील 40 वर्षांपासून त्यांच्यासोबत वावरणारे सहकारी आणि शेतकरी संघटकचे संपादक प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांना 20 लाख रुपये, त्यांची देखभाल करणारे अनंत देशपांडे यांना 20 लाख रुपये आणि गेल्या 15 वर्षांपासून जोशींच्या गाडीचे ड्रायव्हर असलेल्या बबनराव गायकवाड यांना 10 लाख रुपये देण्यात यावे, असं इच्छापत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *