जर तुम्ही एचडीएफसी बँकेचं एटीएम वापरत असला तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. खासगी क्षेत्रीतील दुसरी मोठी बँक एचडीएफसीने ग्राहकांना ट्रान्झॅक्शननंतर मिळणारी स्लिप न देण्याचा निर्णय घेतला आहे.
एटीएममधून मिळणाऱ्या स्लिपऐवजी ग्राहकांना एसएमएसमधूनच विस्तृत माहिती बँकेकडून मिळेल. याबाबत अधिक माहिती देताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “पैसे काढल्यानंतर पेपर स्लिप न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ग्राहकांना एसएमएसद्वारे काढलेल्या पैशांचा आणि अकाऊंटमधील बॅलन्सची माहिती कळवली जाईल.”
बँकेने सध्या काही एटीएममध्ये ही योजना लागू केली आहे. जूनअखेरीस सर्व 11,700 एटीएममध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होईल.