आजपासून बँका चार दिवस बंद

आजपासून बँका चार दिवस बंद

आजपासून सलग चार दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे चार दिवस बँकेचे व्यवहार ठप्प राहतील.

आज २४ डिसेंबरला ईद-ए-मिलाद, तर उद्या २५ डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त बँक कर्मचाऱयांना सुट्टी आहे. तसेच २६ नोव्हेंबरला चौथा शनिवार आणि २७ नोव्हेंबर रविवार आहे, असे सलग चार दिवस बँका बंद असणार आहेत.

त्यामुळे ग्राहकांना त्यांचे महत्त्वाचे बँक व्यवहार करता येणार नाहीत. आता ग्राहकांना थेट सोमवारपर्यंत बँका उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, बँक हॉलिडेच्या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएम सेवा अखंडित सुरु राहण्यासाठी शनिवार 26 डिसेंबरला केवळ एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी बँका काही वेळासाठी सुरु राहणार आहे, मात्र या वेळेत कुठलेही बँकेचे व्यवहार होणार नाहीत.

तसंच बँकांचे ग्राहक सेवा केंद्र सुरु राहणार असल्याने याच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण यांसारखे व्यवहार करता येणार आहेत.

बँकांच्या सुट्टीचे दिवस

24 डिसेंबर – ईद ए मिलाद

25 डिसेंबर – ख्रिसमस

26 डिसेंबर – चौथा शनिवार

27 डिसेंबर – रविवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *