पुण्यात पोलिसांवर झालेल्या गोळीबारप्रकरणी अक्षय सोनी या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आपटे रोडवर पोलिसांवर गोळीबार झाल्याची बातमी सगळीकडे पसरल्यावर अक्षयने स्वतः आई वडिलांसह डेक्कन पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या गुन्हा कबूल केला.
अक्षय सोनी याच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अक्षय सोनी पुण्यातील आनंद कॉलनीत राहतो. अक्षयचं कुटुंब मूळचं परभणीचं असल्याचं कळतं.
अक्षय हा बाईकवर मागे बसला होता. मात्र त्याने गोळीबार केलेला नाही. पोलिसांवर गोळी झाडणारा आरोपी अद्यापही फरार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली आहे.
पाठलाग करताना आपटे रोडवरील पाटील बंगला परिसरात मयूर भोकरे आणि संदेश खडके या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोपीने गोळीबार केला होता. सुदैवाने भोकरे यांच्या बुटाला गोळी चाटून गेल्याने ते बचावले.