फ्रान्समध्ये झालेल्या अपघातात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना दुखापत झाली आहे. केरी यांचा उजवा पाय मोडला असून त्यांना उपचारांसाठी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेटस जनरल हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येणार आहे.
केरी हे सकाळी सायकलवरून पडले. केरी यांची यापूर्वीच्या मांडीच्या हाडाच्या शस्त्रक्रिया झालेल्या भागावरच ही दुखापत झाली आहे.

