इराकला मिळाली चार दशकांनंतर ब्युटी क्वीन

इराकला मिळाली चार दशकांनंतर ब्युटी क्वीन

सद्दाम हुसेनच्या इराकसारख्या कट्टरवादी वातावरण असलेल्या आणि दहशतवाद्यांचा आसरा असलेल्या देशात सौंदर्यस्पर्धा ही कल्पनाच विचित्र. परंतु तब्बल चार दशकांनंतर शनिवारी बगदादमध्ये मिस इराक ही सौंदर्यस्पर्धा पार पडली आणि इराकच्या किर्कुक शहरातील २० वर्षीय हिरव्या सुंदर डोळ्यांची शायमा अब्देलरहेमान ही मिस इराकची मानकरी ठरली. १९७२ नंतर प्रथमच इराकमध्ये अशी स्पर्धा पार पडली.

अर्थातच यावेळी मद्यपानास सक्त मनाई होती आणि स्विमसुट स्पर्धा तर नव्हतीच. इराकच्या बाहेरच्या जगातील काहींना वाटते की, आम्ही आयुष्यावर प्रेम करतच नाही, असे आयोजक हुमाम अल ओबेदी म्हणाले. बगदाद हॉटेलच्या बॉलरूममध्ये ही सौंदर्यस्पर्धा झाली, तेव्हा प्रचंड गर्दी लोटली होती. शायमाला निवडण्याचा निर्णय जमलेल्यांच्या पसंतीचा होता. अनेक पुरुष आपापल्या खुच्र्र्यावर उभे राहून तिच्या नावाचा अगोदरच पुकारा करत होते.

इराकी लोक आधुनिकतेच्या दिशेने निघाले आहेत, हे पाहून मला अत्यानंद होत आहे, असे शायमा नंतर वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली. तिच्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी इराकी चाहत्यांची झुंबड उडाली होती. इराकी नागरिकांच्या चेह-यावर प्रथमच हसू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *