शनिशिंगणापूरमध्ये शनिश्वराच्या चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना सुरक्षारक्षकांनी अडवले आहे.
त्यामुळे शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. भूमाता संघटनेच्या प्राची देसाई आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.
महिलांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षारक्षकांनी या महिलांना अडवून पोलीस स्टेशनला नेलं. या महिलांची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी
करण्यात आली. काही दिवसापूर्वी पुण्यातली एक महिला शनिश्वराच्या चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचं दर्शन घेऊन आली होती.
त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. शिवाय काहीच दिवसांपूर्वी विश्वस्तपदासाठी महिला उमेदवार रिंगणात उतरणार
असल्याचं वृत्त होतं.
शनिच्या चौथऱ्यावर जाण्याचा महिलांचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांची आडकाठी
