प्रीमियर बॅडमिंटन लीग २ जानेवारीपासून

प्रीमियर बॅडमिंटन लीग २ जानेवारीपासून

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) प्रीमियर बॅडमिंटन लीगला (पीबीएल) दोन जानेवारी २०१६पासून सुरुवात होत आहे. सलामीची लढत अवध वॉरियर्स आणि मुंबई रॉकेट्समध्ये मुंबईत होईल.

१७ जानेवारीपर्यंत चालणा-या पीबीएलमध्ये पाच फ्रँचायझींचे संघ मुंबई आणि अवधसह (लखनौ) दिल्ली, हैदराबाद, बंगळूरुमध्ये खेळतील. पाऊस आणि पुराचा फटका बसल्याने पीबीएलच्या लढती चेन्नईत होणार नाहीत. चेन्नई स्मॅशर्सच्या ‘होम’ लढती लखनौ आणि हैदराबादमध्ये होतील.

लखनौतील अवध वॉरियर्समध्ये जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेली सायना नेहवाल लीगचे प्रमुख आकर्षण आहे. तिला अवध वॉरियर्सनी करारबद्ध केले आहे. पी. व्ही. सिंधूला चेन्नईने सर्वाधिक बोली लावली आहे. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपला हैदराबाद तसेच अजय जयरामला दिल्लीने करारबद्ध केले आहे.

पूर्वीची आयबीएल आता पीबीएल

दोन वर्षापूर्वी झालेल्या पहिल्यावहिल्या इंडियन बॅडमिंटन लीगचे (आयबीएल) आता प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) असे नामकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *