सायना नेहवालच्या जीवनावर बनणार चित्रपट

सायना नेहवालच्या जीवनावर बनणार चित्रपट

भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालच्या जीवनावर आधारित लवकरच चित्रपट बनणार आहे. तारे जमीं परचे दिग्दर्शक अमोल गुप्ते हा चित्रपट बनवणार असून याचे शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार आहे.

सायनाचे वडील हरवीर सिंग यांनी ही माहिती दिलीय. अमोल गुप्ते माझ्या मुलीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहेत. पुढील वर्षी चित्रीकरण सुरु होईल. दरम्यान, याबाबतची नक्की तारीख सांगण्यात आलेली नसल्याचे हरवीर सिंग म्हणाले.

या चित्रपटासाठी आमचे कुटुंब फारच उत्सुक आहे. चित्रपटात सायनाऐवजी बॅडमिंटवनवर अधिक फोकस देण्यात आला तर खेळाच्या दृष्टीकोनातून ते चांगले असेल. चित्रपटात सायनाच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण अथवा आलिया भट यांच्या नावांची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *