मुंबईत विमानाच्या पंख्याला अडकून एकाचा मृत्यू

मुंबईत विमानाच्या पंख्याला अडकून एकाचा मृत्यू

मुंबई विमानतळावर एअर इंडिया विमानाच्या पंख्यामध्ये अडकून एका कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास  घडली.

रवी सुब्रह्मण्यम असे या कर्मचा-याचे नाव असून ते तिथे ग्राऊण्डस्टाफ म्हणून काम पाहत होते.

मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री एअर इंडियाचे ‘एआय ६१९ मुंबई-हैद्राबाद’ हे विमान उभे होते. काम करत असतांना सुब्रह्मण्यम या पंख्यात अडकून त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

एअर इंडियाकडून अभियंता रवी सुब्रह्मण्यमच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची भरपाई आणि एका सदस्याला नोकरीची संधी दिली जाणार आहे. ‘डीजीसीए’च्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

गेल्या काही वर्षांमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *