सर्वात महागड्या ‘रोबो 2’ मध्ये अक्षयकुमार खलनायक!

सर्वात महागड्या ‘रोबो 2’ मध्ये अक्षयकुमार खलनायक!

रजनीकांतच्या रोबो 2 चित्रपटात बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता अक्षयकुमार भूमिका साकारणार आहे. अक्षय चित्रपटात
खलनायकाची व्यक्तिरेखा करणार असल्याच्या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे हृतिक, अमिताभ बच्चन
यांच्यापासून आर्नॉल्ड श्वार्त्झनेगर भूमिका करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रोबो 2 चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून कास्ट आणि क्रूचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या, शंकर यांचं दिग्दर्शन असलेल्या रोबो चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. पहिल्या भागात ऐश्वर्या राय बच्चने भूमिका साकारली होती, तर सिक्वेलमध्ये एमी जॅक्सन दिसणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयकुमार बऱ्याच वर्षांनी निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे.

रोबो 2 चं बजेट 250 कोटींच्या घरात असून हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं चित्रीकरण 3D मध्ये होणार असून 2017 मध्ये चित्रपटगृहात झळकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *