मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवरील सहा मार्गावर उद्या रात्री पावणेबारापासून जवळपास आठ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल.

सीएसटीहून कर्जतसाठी शेवटची लोकल ही रात्री साडेअकरा वाजता आणि पनवेलासाठी रात्री अकरा वाजता सुटेल. तर २० डिसेंबरला सीएसटीहून पहिली लोकल ही नेहमीप्रमाणे सकाळी ४.१२ मिनिटांनी सुटेल.

तर कर्जतहून सीएसटीसाठी पहिली लोकला सकाळी ४.५८ वाजता सोडण्यात येईल. त्यामुळे शेवटची लोकल चुकवू नका असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येतेयं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *