मेट्रोच्या भाडेवाढीला तुर्तास स्थगिती

मेट्रोच्या भाडेवाढीला तुर्तास स्थगिती

मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला तुर्तास स्थगिती मिळाली असून याप्रकरणी पुढची सुनावणी आता येत्या २९ जानेवारीला होणार आहे.   त्याआधी मेट्रोने भाववाढ करु नये, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

एमएमआरडीएने केलेल्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत मेट्रोची दरवाढ करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.  त्यामुळे काहीकाळासाठी मुंबईकरांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

मेट्रो तिकीट दर निश्चिती समितीने केलेल्या शिफारसींनुसार मेट्रोला तिकीट दरांमध्ये १० ते ११० रुपयांपर्यंत दरवाढ करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, एमएमआरडीएने त्यावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *