शाही ब्रेड भल्ला
साहित्य : 6 सॅण्डवीच ब्रेड, एक किंवा अर्धी वाटी फेटलेलं गोड दही, 1 चमचा कॉर्नफ्लोअर.
स्टफिंगसाठी : 1क् काजू बारीक कापून, 1क् किसमीस, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून किसलेलं आलं, वरून टाकण्यासाठी 1 चमचा चिंचेचा सॉस, जिरे पावडर,
1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम स्टफिंगसाठी काजू व किसमीस बारीक कापून घ्यावेत. त्यात किसलेलं आलं व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकत्र करून ठेवावं. नंतर सर्व ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात. एका बाऊलमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक ब्रेड बुडवून लगेच काढून दोन्ही हाताच्या तळव्यांनी हलकं दाबून पाणी काढून घ्यावं. त्यात तयार केलेलें स्टफिंग भरून ब्रेड बंद करावा. ब्रेडला ओवल आकार द्यावा व कॉर्नफ्लोअरमध्ये रोल बुडवावा. अशा प्रकारे सर्व तयार करून घेऊन तेलात मध्यम आचेवर सर्व डीप फ्राय करावेत. सर्विग बाऊलमध्ये सर्व भल्ले ठेवावेत. दह्यामध्ये चवीला मीठ, साखर घालून दही फेटावं. फेटलेलं दही भल्ल्यावर टाकून वरून तिखट, जिरे पावडर व चिंचेचा सॉस घालावा.
ब्रेड सीगारेलो
साहित्य : 1क् सॅण्डवीच ब्रेड, 2क्क् ग्रॅम पनीर, 4 चीझ क्यूब, 2 चमचे मैदा (पाणी टाकून पेस्ट करुन घ्यावी), 1/2 कप हिरवी चटणी (मिरची, कोथिंबीर, पुदिना, साखर, मीठ, लिंबू टाकून पेस्ट स्वरूपात करून घ्यावी) आणि तेल.
कृती : प्रथम ब्रेडच्या कडा सुरीनं काढून घ्याव्यात. ब्रेड लाटण्यानं लाटून घ्यावेत. त्यावर हिरवी चटणी लावावी. त्यावर पनीर आणि चीज किसून टाकावं. ब्रेड गोल गुंडाळून रोल तयार करून मैद्याची पेस्ट लावून बंद करावा. अशा प्रकारे सर्व रोल तयार करून घ्यावेत. तेल गरम करून सर्व रोल डीप फ्राय करावेत. हिरवी चटणी किंवा सॉससोबत ब्रेड सीगारेलो मस्त लागतात.
ब्रेड चाट
साहित्य : 8 सॅण्डवीच ब्रेड, 6 मध्यम आकाराचे उकडून कुस्करलेले बटाटे, 2 कांदे बारीक कापलेले, 1/4 कप बारीक कापलेली कोथिंबीर, 1 कप फेटलेलं गोड दही, 2 चमचे चिंचेची चटणी, 1/2 चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा किंवा इच्छेनुसार चाट मसाला, 1 वाटी बारीक शेव, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बटर.
कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक कापलेला कांदा टाकावा. दोन मिनिटं परतून त्यात तिखट, मीठ, गरम मसाला व कुस्करलेला बटाटा टाकून मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं. ब्रेडचे वाटीच्या साहाय्यानं गोल काप करावेत. तव्यावर बटर टाकून ब्रेड खरपूस भाजून घ्यावेत.
एका ब्रेडवर बटाटय़ाचं मिश्रण लावावं आणि त्यावर दुसरं ब्रेड ठेवावं. अशा प्रकारे सर्व ब्रेड तयार करून घ्यावेत. खायला घेताना बाऊलमध्ये ठेवून त्यावर फेटलेलं दही, तिखट, जिरे पावडर, आवडत असेल तर चाट मसाला, चिंचेची चटणी, कोथिंबीर आणि शेव टाकून खायला घ्यावं.
कर्ड सॅण्डवीच
साहित्य : 1क् सॅण्डवीच ब्रेड, 2 कप ताजं दही, 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर, 3/4 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 इंच बारीक चिरलेलं आलं, 1क्-12 कढीपत्त्याची पानं, 3 चमचे साखर, मोहरी, आवश्यकतेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम दही पातळ कपडय़ात 3 ते 4 तास बांधून ठेवावं. मग एका बाऊलमधे काढून त्यात साखर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. ब्रेडची एक स्लाईस घेऊन त्यावर दोन चमचे दह्याचे मिश्रण टाकून ब्रेडवर ते सगळीकडे पसरावं व त्यावर ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड तयार करून घ्यावेत. एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालावं. त्यात मोहरी आणि कढीपत्ता टाकून नंतर तयार केलेली ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवून ती दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यावी. अशा प्रकारे सर्व ब्रेड भाजून घ्यावेत. ब्रेड त्रिकोणी कापून ते हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खावेत.
शाही ब्रेड रोल
साहित्य : 1क् मिल्क ब्रेड स्लाइस, 1 वाटी खवा, 1/2 वाटी पिठीसाखर, 1/2 वाटी कापलेला सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता, किसमिस), जायफळ, 1 चमचा वेलची पूड, 1 कप दूध, 1 चमचा मध, रोल फ्राय करण्यासाठी तूप किंवा बटर, सजावटीसाठी चांदीचा वर्ख.
कृती : एका कढईत खवा घेऊन तूप सुटेर्पयत मंद आचेवर परतावा. खवा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, मेवा, जायफळ, वेलची पूड टाकून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावं. ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात. ब्रेडची एक स्लाइस घेऊन ती दुधात बुडवावी आणि लगेच काढून हलक्या हातानं दाबून त्यातलं जास्तीचं दूध काढून घ्यावं. ब्रेडची स्लाइस पोळपाटावर ठेवून त्यात खव्याचं मिश्रण (एक ते दीड चमचा) टाकून हलक्या हातानं ब्रेडचा रोल करावा. नॉनस्टिक पॅनमधे तूप किंवा बटर घेऊन त्यात रोल श्ॉॅलोफ्राय करावेत. रोल बदामी रंगाचे झाल्यावर काढून घ्यावेत. अशा प्रकारे सर्व रोल तयार करून घ्यावेत. एका प्लेटमधे अरेंज करून वरून चांदीचा वर्ख लावावा आणि मध टाकावं.